Posts

Showing posts from 2020

चिलयपाटी

जेंव्हा सगळीकडे हिरवेगार असेल आणि सगळे मस्त असेल तेंव्हा ह्या खेळाचा मौसम सुरु होतो. यात सगळेच आले. गाई-म्हशी , गुरे-ढोरे , शेळ्या आणि खिल्लारे जेंव्हा खाऊन मस्त असतात आणि निमुटपणे चरतात तेंव्हा सगळी ढोरकी , गुराखी आणि शाळकरी मुले , गुरांना नदीत सोडून आणि शाळेला बुट्टी मारून किंवा खेळायच्या तासाला निवांत मनाने हा खेळ खेळू शकतात. मस्त श्रावणातला पाउस , रात्रभर पडून जमीन तृप्त झालेली असते आणि जेंव्हा रानात काही काम नसते , जेंव्हा शेतातही वाफ नसते तेंव्हा हा खेळ सुरु होतो गावाच्या पानढरीत... याला काही लागत नाही फ़क़्त मस्तवालपणा असावा लागतो अंगात वारा पिवून उधळणाऱ्या खोंडा सारखा. आणि कुणावर तरी मचकायची खुमखुमी. रान डुकरा सारखी धडस आणि गेंड्या सारखी थोपवायची ताकद. माकडासारखा आगाऊपण आणि गाढवा सारख्या लाथा मारायच्या असतात. हरिणाचा चपळपण आणि कांगारूची उंच उडी. असे सगळे जेंव्हा एकत्र येतात आणि जमीन असते निसरडी आणि लोण्यासारखी मऊ तेंव्हा हा खेळ सजतो. ज्यांनी तो खेळला आहे ते भाग्यवान कारण तो आता काळाच्या ओघात गडप झालाय त्याचा काही मागमूस लागत नाही , कुठून आला आणि कोणी आणला , इतर कुठेही मी त...

नांगरणी

जेंव्हा सगळीकडे रणरनते ऊन असते , झाडे सुद्धा सावली मागतात तेंव्हा नांगरणीला सुरुवात होते.   आत आणि बाहेर उन्हाळा असतो , सगळीकडे भकास असते ! प्रेमाचा , पाण्याचा आणि पैशाचा दुष्काळ असतो तेंव्हा नांगरणीला सुरुवात होते. जेंव्हा हंगामावर आलेले पक्षी सग्या सोयर्‍यांसारखे उडून जातात तेंव्हा नांगरणीला सुरुवात होते.   दूरवर फक्त आग आणि उडणारी धूळ जेंव्हा डोळे करपवते जेंव्हा अश्रुही मदतीला येत नाही तेंव्हा नांगरणी सुरू करतो मी ! उद्यासाठी जमीन तयार करतो. स्वप्न म्हणून नाही तर कर्तव्य म्हणून.   42-47° तापमानात जेंव्हा मजूर अंगाला राख फासून जोगडे होतात , तेंव्हा डोक्याला रुमाल बांधून , ग्वागल लाऊन आपण आपली स्टाइल दाखवत ट्रॅक्टरला धक्का मारतो! त्यासाठी बूट पण धंनगरी असावे लागतात. ट्रक्टर डिझेलने फूल केला , पाण्याची बादली नागरला अडकवली , हायड्रोलिक वर केला , ब्रेक काढला की आपण मार्गस्थ. धुळीचा प्रचंड लोट उडवत. धड धड - खड खड. इथे कुठे आलाय आराम इथे तर मागच्या फळीवर लटकुन बसायला पण कसब लागते. प्रभू - थोडो ऊन उतरब दे न ! काही घाई है !   मी - आनो है त चल नाही त म चल्...