चिलयपाटी


जेंव्हा सगळीकडे हिरवेगार असेल आणि सगळे मस्त असेल तेंव्हा ह्या खेळाचा मौसम सुरु होतो. यात सगळेच आले. गाई-म्हशी, गुरे-ढोरे, शेळ्या आणि खिल्लारे जेंव्हा खाऊन मस्त असतात आणि निमुटपणे चरतात तेंव्हा सगळी ढोरकी, गुराखी आणि शाळकरी मुले, गुरांना नदीत सोडून आणि शाळेला बुट्टी मारून किंवा खेळायच्या तासाला निवांत मनाने हा खेळ खेळू शकतात. मस्त श्रावणातला पाउस, रात्रभर पडून जमीन तृप्त झालेली असते आणि जेंव्हा रानात काही काम नसते, जेंव्हा शेतातही वाफ नसते तेंव्हा हा खेळ सुरु होतो गावाच्या पानढरीत...

याला काही लागत नाही फ़क़्त मस्तवालपणा असावा लागतो अंगात वारा पिवून उधळणाऱ्या खोंडा सारखा. आणि कुणावर तरी मचकायची खुमखुमी. रान डुकरा सारखी धडस आणि गेंड्या सारखी थोपवायची ताकद. माकडासारखा आगाऊपण आणि गाढवा सारख्या लाथा मारायच्या असतात. हरिणाचा चपळपण आणि कांगारूची उंच उडी. असे सगळे जेंव्हा एकत्र येतात आणि जमीन असते निसरडी आणि लोण्यासारखी मऊ तेंव्हा हा खेळ सजतो. ज्यांनी तो खेळला आहे ते भाग्यवान कारण तो आता काळाच्या ओघात गडप झालाय त्याचा काही मागमूस लागत नाही, कुठून आला आणि कोणी आणला, इतर कुठेही मी त्याबद्दल ऐकले नाही कि पहिले नाही. आपल्या गावाची ती एक ओळख आता नष्ट झालीय, नव्या खोपला माहीतही नसेल बहुतेक कि त्यांचे बाप जादे ह्या खेळत हात पाय तोडून बसलेत.
सूर, चिली, गाबडेल आणि सगळ्या शिव्या.

थारी मायीको दुध पेल होणगो त इधरस चिली जाकन दखा ! मिस्टरू थारी कंबर नही तोडी त, नाव नि लगाशेल !!

आव्हान प्रती आव्हान आणि चिखलात माख्ण्याची मजाच काही और होती. कायम गुड्गे आणि कोपर फुटलेली कारण त्यांची रिकव्हरी व्हायची नाही. घासून घासून काळे व्हायचे हात, पाय. दुश्मन आणि दोस्त सगळे एकमेकांना घोमसाळायचे. आधीचे राग आणि बदले इथे व्यक्त व्हायचे आणि मन निर्मल होऊन परत मित्र व्हायचे. एकमेकांचा अंदाज यायचा. चिली जाणारा हा बहुतेक चपळ आणि हरणाच्या वेगाचा असायचा त्याच्या गुद्ग्याखाली कुणीही लाथ मारली तर ती पार्टी हरायची त्यामुळे एक जबाबदार आणि तरबेज मुलगा तिकडे लागायचा. बाकीचे चार कोपरे सांभाळायचे गर्जे नुसार चारचे आठ कोपरे हि व्हायचे जिथे तिथे सगळ्या झटापटी चालायच्या. एकाच वेळेला २-३ मिळून ताणायचे कुणी मागून ढकलेल तर कुणी पायाखाली लाथ मारेल सूर सांभाळणारा फक्त ३ बाजू सांभाळू शकायचा आणि बाकीचे चौकोनाचे चारही बाजू सांभाळायचे. हि सगळी मारामारी चालू असतांना चिलय बोर्डर ओलांडायचा आणि त्याला परत आणण्यासाठी त्याची टीम बोर्डर वाल्या टीमला गुतावून ठेवायची.

चिली भित्तर आरही है, आउकी !

म्हणजे जिथे दोन रेषा ओलांडाव्या तिथे फ़क़्त एकाच ओलांडावी लागेल. पण तो आत आला तर त्याला लाथ मारणे सोपे जायचे. नाहीतर मग तो यायची वाट पाहत बस.

छोटू तुला घरी बोलावलं बाईने मी फ़क़्त मान डौलवायचो, २-३ निरोप असे कोणी कोणी आणून द्यायचे मग कुणीतरी म्हणे बाईने बोलाविले नाहीतर ती धांडा घेऊन येतेय. एक दिवशी हा निरोप टाळला आणि आई मारत मारत घेऊन गेली. पण संध्याकाळी चिली पाटी साठी हजर. संध्याकाळी त्याच मैदानात जर खरपाड पडली तर इतकी धूळ उडायची (आम्हीच ती गुलाला सारखी उडवायचो) कि सगळे त्यात न्हाऊन निघायचो मग जाऊन नदीत डुंबायचं नाहीतर हातपाय धुवून घरी जायचो, पण ती धूळ आणि बिना साबणाचे पाणी, पायावर अशी नक्षी काढायचे कि कुणीतरी कुत्सितपणे टोमणा मारायचे

काय रे कुत्रे मुतले वाटत !त्याला खाऊ कि गिळू नजरेने पहायचे आणि पुटपुटत शिव्या द्यायच्या. 

मातीचे आणि आमचे असे काही गहिरे नाते होते कि जखमेवर सुद्धा आम्ही ती मातीच रगडून द्यायचो, ती माती स्वच्छ होती, सेंद्रिय होती, शरीराला ती मानवायची. चिलयपाटी मध्ये खूप थकायला व्हायचे, हा खेळ सतत खेळल्यामुळे शरीरात एक वेगळीच रग यायची. सकाळी उठल्यापासून ते रात्री डोळे लागे पर्यंत कॅलरीज किती खर्च होतील याचा हिशोबच नव्हता त्यामुळे सगळे मित्र काटक आणि सिक्स प्याक होते. त्यासाठी वेगळे काही करावे लागत नसे. नदी खळखळ वाहायची, ह्या सगळ्या थकव्या नंतर तिच्यात दुम्बायची एक वेगळीच ओढ होती. ठरवून असे काही होत नसे पक्षासारखे सगळे स्वच्छंद होते. या खेळात ज्यांची पकडची प्रक्टिस असायची त्यांना खूप वाव असे. गोठण वरचा विठ्ठल, गणेश हे सगळे चिवट गडी होते. गणेश तर लसून खायचा, विठ्ठल भिजवलेली उरीदाची दाल खाऊन. व्यसन कुणालाच नव्हते तोपर्यंत गावात पुड्या (विमल,माणिकचंद) आलेल्या नव्हत्या. गाय छाप खाणारे एक दोघे जन असतील ते चोरून लपून खायचे, बिड्या पिणारे लपून बिडी प्यायचे. मोठ्यांना मान होता एक आदरयुक्त भीती होती. बिडी, तंबाखू ला सार्वजनिक मान्यता मिळालेली नव्हती. गावातील मोठी आणि आदरणीय माणसे ह्या सगळ्यापासून लांब होती. जी काही विकारी होती त्यांचे विकार त्यांच्या घरातच होते.

🏁 Chilay Pati – Traditional Rajasthani Stealth & Strategy Game

🌎 Overview

Chilay Pati is a traditional field game from Rajasthan that blends elements of stealth, physical strategy, deception, and team combat. It is played between two teams: Team A (Defenders) and Team B (Attackers). One player from Team B, secretly chosen as Chilay, must cross a guarded square, declare his identity, and return safely while his team distracts and battles Team A.


⚖️ Objective

  • Team B (Attackers): Secretly send one player (Chilay) to cross the square, declare his identity after crossing, and then return home without getting tagged.

  • Team A (Defenders): Identify, track, and tag Chilay below the knee after he declares. Alternatively, win by defending their positions or protecting their knight (Sur).


🏛️ Field Design

□ Square Layout

  • Large square (approx. 10m x 10m) marked on the ground.

  • One vertical line divides it into two equal halves.

  • One horizontal line intersects the vertical line at the center, forming an "I" shaped path.

🔹 Movement Zones

  • Sur (Team A Knight): May move only along the "I" path.

  • Team A Supporters: Move only along the outer boundary of the square.

  • Team B Players: Free to move outside the square.


👥 Team Structure

🔹 Team A – Defenders

  • Sur (Knight):

    • Moves only on the "I" track.

    • Objective: Tag Chilay after declaration.

    • If pushed off the "I" path, Team B wins immediately.

  • Support Players:

    • Move along the boundary of the square.

    • Can defend Sur and tag attackers (below the knee).

    • Must avoid being pushed out of the square.

🔹 Team B – Attackers

  • Chilay (Hidden Player):

    • Crosses the square undetected.

    • Once safely past, announces "Chilay!"

    • Returns to his base undetected to win.

  • Support Players:

    • Engage in push/pull battles.

    • Distract and overwhelm defenders.

    • Protect Chilay during the return.


⏱ Gameplay Phases

① Phase 1 – Entry & Deception

  • Team B starts on one side outside the square.

  • Team A is inside the square.

  • Team B moves toward the square; Chilay secretly crosses into Team A's territory.

② Phase 2 – Declaration

  • Once across, Chilay yells "Chilay!".

  • He is now immune from tagging at this moment.

  • Team A now activates full defense mode:

    • Supporters start running along the boundary.

    • Sur becomes alert to track Chilay's return.

③ Phase 3 – Battle & Return

  • Team B support players push and pull defenders.

  • Team A tries to hold positions and protect Sur.

  • Chilay must secretly cross back through the battle.

  • Sur must tag Chilay on return to win.


⚠️ Win Conditions

✅ Team A Wins If:

  • Sur tags Chilay below the knee on his return.

  • Team B fails to return Chilay.

✅ Team B Wins If:

  • Chilay crosses and returns without being tagged.

  • Sur is pushed off his "I" path.

  • Team A defenders are all displaced.


🧠 Strategy Tips

🔹 For Team A:

  • Stay alert for subtle movement clues before declaration.

  • Protect Sur using tight coordination.

  • Create a perimeter defense to restrict movement.

🔹 For Team B:

  • Use multiple players to mimic being Chilay.

  • Declare at the right time when defenders are distracted.

  • Create diversions and sneak Chilay across during chaos.


🤝 Fair Play & Safety

  • No choking, hair pulling, or hitting.

  • Only below-the-knee tagging is allowed.

  • Game should be played on a soft field (mud or grass).

  • Respect the Chilay declaration as a turning point.


🎭 Cultural Relevance

  • Reflects valor (Sur), stealth (Chilay), and team loyalty.

  • Game of strategy, deception, and courage.

  • Ideal for reviving community sports rooted in heritage.


📅 Optional Add-ons

Would you like a:

  • ✏️ Field Diagram?

  • 📋 Printable PDF Rulebook?

  • 💃 Poster/Flyer Design for Events?

Let me know and I’ll prepare them!

Comments

Popular posts from this blog

नदी

मसनखडी आणि चुनीलाल गवळी

देवमाणूस

नाना

एसटी

नांगरणी

मराठी मुलांची शाळा, कासमपुरे

मनोगत

ओळख