Posts

पडझड

  पडझड गावात माझ्या लहानपणी काही मोजकीच घरे होती ज्यांची मुले शाळेत चप्पल घालून येत, ते सुखवस्तू होते. ७०-८० एकर काळीच्या जमिनी, राहायला चुन्याची हवेली वजा पक्की घरे, देवढीतले लाकूड काम घराला शिसम ची खांब आणि आरे असलेले धाबे, खाली शहाबादी फरशा. मोठ मोठे ओटे, त्यांना लावलेल्या घोडे बांधायच्या कड्या, पाण्याचे हौद, मोरीला असलेले धुण्याचे दगड. फक्त गुरे बांधण्यासाठीचे, पत्र्याचे छप्पर असलेले, पक्के वाडे. त्यांचे राहणीमान सुद्धा डौलदार असे. गुलाबी, लाल लाल पागोटे, कानात भीक बाळ्या, बोटात वेगवेगळ्या अंगठ्या, किमती चढावे. छोट्या छकडा गाडीत त्यांची सवारी शेतातील बांधा पर्यंतच जात असे. या मंडळींची मुले बहुधा व्यसनी होती. श्रीमंत आणि दरारा असलेल्या आई बापाची व्यसनात वाया गेलेली दुसरी ऐदी पिढी तिसर्या पिढीला भिकेला बसविते हा अनुभव मी घेतला आहे. त्यांच्या नातवांच्या लग्नात पहिल्यांदा गावात तमाशा आला. हे नातू मंडळी म्हणजे माझ्या वर्ग मित्रांचे लहान बंधू- बांधव. तमाशाला नाचणाऱ्या बाया आल्या, गणपतराव आले , तगतराव आले. आता पर्यंत रामजी बाबाच्या कीर्तनावर पोसलेल्या मनाला नवीन Food for thought Or ...

ओटी आणि बीज

  संध्याकाळी पडून गेलेला तुफान पाऊस , शेतात वाफ असेल कि नाही हि चिंता पण पेरायचा उत्साह अगदी लहान मुलासारखा. चलो - निकलो , व्होयो काई , कर अभी व्होयो नही थामारो ? काई थंडो मान्डो है थामारो. चला निघा , झाले का तुमचे ? अजून झाले नाही ! अरे कसले निवांत राव ? अरे आटोप राजा लवकर जीव जातोय माझा इथे , सगळे पेरणे व्हायला पाहिजे. पेरण्यासाठी आणि प्रोजेक्ट म्यानेजमेंट च्या परीक्षेला सारखाच अलर्ट पण लागतो. दलींदर लोकांचा तो विषय नाही त्यांनी तिकडे फिरकूही नये. बीजाचे रोपण हा पूजेचा विषय असतो , सारख्या लयीत , सारख्या तालासुरात , बैलांचे चालणे , पामरीचा वेग मागच्या पास धरनार्याचा वेग , चाड्ड्यावरची मुठ , माउलीचा वेग , मागे बैल हाणनार्याचा वेग सगळे कसे एक अद्वैत झालेले असते. सगळे बसतील पण त्यांना उसंत नाही , शेतकऱ्याला भरून येणारे आभाळ दिसते , त्याचा जीव कासावीस होतो , सगळे आज एकाच दिवशी पार पडलेत तर माझे पिक समान येयील. मोठ्या शेतकऱ्याला तर दुप्पट टेन्शन , पाऊस आला तर , काम अपूर्ण राहिले तर ? कितीतरी मजूर लावलेले असतात , त्यांची मजुरी वाया नको जायला. बिजवाई , मटेरेल भिजले तर ? पाणी आणून ठ...

बशीर ब्रास ब्यांड लोहारा.

  बशीर ब्रास ब्यांड लोहारा.   लग्न मंडप सजलेला असे , यांचे आगमन व्हायचे तेच मुळात मोठ्या ढोल च्या उगीच वाजवलेल्या बीट्स ने. खुळखुळा , मधूनच पितळी पिपाणी चा आवाज खात्री करून द्यायचा कि आम्ही आलो आहोत. (We arrived) आम्ही हातातील सगळी कामे सोडून तिकडे धाव घ्यायचो. सुरवातीला ते आले म्हणजे घाम पुसायचे त्यांना शेजारच्या गावातून पायी चालत यावे लागायचे, वाद्य साधने डोक्यावरून खाली उतरवायचे, ५-६ जन असायचे बाकीचे २-३ transit मध्ये असत. मुसलमानी हिंदी आम्ही यांच्या कडून शिकलो. (तेरकू मै क्या कह रा, तू पाणी लेके आन भाऊ. मेरकू बडी प्यास लगी है, कित्ता तपरा आजकल.) धावत जावून जग आणायचा भरून पण तेवढे पाणी एकटा मास्टरच पिवून टाकायचा. “ओ बेटा तू वो पानिकी कळशी भरके ला, इत्तेमे हमारा क्या होता !”   दोन्ही हातांनी तोल सावरत कळशी भरून दिली कि ते आम्हाला त्यांच्या पिपाण्याना हात लावू देत. मास्टर म्हणजे आम्हांला परब्रम्ह वाटत असे. म्हणजे त्याने आमचे आवडीचे गाणे वाजवले तर, याची देही याची डोळा त्याचा प्रत्यय येई. आर बाजेवले, बजाव. फुकट के पैसे लिये वाटत, कुणीतरी दारुड्या पिंक टाकायचा, मास्टर ...

पांडवप्रताप

  पांडवप्रताप हटकर गल्लीत मंजुळा मावशीच्या घरी किंवा संपत मामाच्या घरी पांडव प्रताप, हरी विजय, श्री राम विजय, भक्ती विजय, नवनाथ किंवा महाभारत अशा पोथी वाचन असे. रोज रात्री ८:०० ते ९:००/१०:०० असे हे वाचन असे. मंजुळा मावशीच्या दारात उंबराचे झाड होते, तिचा मुलगा राजू माझ्या २ वर्ष पुढे होता. त्याला आम्ही जरदाळू म्हणत. गावात प्रत्येकाचे वेगवेगळे नाव होते. गावातील आया बाया आणि भाविक जण तिथे जमत. पोथी वाचनाराचे एक उच्चासन होते. इलेक्ट्रिक मोटर दुरुस्त करणारा अमरभाऊ मरमट हा एक उत्तम भाष्यकार होता. अमर भाऊ अंगलटने खूप बारीक होता जुन्या मराठीतील त्या ओव्या तो बोली भाषेत सोप्या करून वाचून दाखवायचा. नुकताच पडून गेलेला पाउस, चिखलातून चालत आलेले आम्ही तिथल्या पन्हालीच्या पाण्याने पाय धुवून आत शिरायचो, ओट्यावर किंवा घरात बसण्याची मांडणी असे. पटगर किंवा झोर्या अंथरलेला असे.   वेगवेगळे लोक कुणबी मराठी आणि परदेशी भाषा बोलायचे त्यामुळे शाळेत आम्ही कुणबी मराठी आणि गावातील व्यवहारात परदेशी बोलायचो. माय वो , आह्याSSSSSय भागाबाई काल कुठी गेलत्या ? ह्योनी आला ? कर वा या नामदेव आयोकी ? आज या का...