नांगरणी


जेंव्हा सगळीकडे रणरनते ऊन असते, झाडे सुद्धा सावली मागतात तेंव्हा नांगरणीला सुरुवात होते. 
आत आणि बाहेर उन्हाळा असतो, सगळीकडे भकास असते ! प्रेमाचा, पाण्याचा आणि पैशाचा दुष्काळ असतो तेंव्हा नांगरणीला सुरुवात होते. जेंव्हा हंगामावर आलेले पक्षी सग्या सोयर्‍यांसारखे उडून जातात तेंव्हा नांगरणीला सुरुवात होते. 
दूरवर फक्त आग आणि उडणारी धूळ जेंव्हा डोळे करपवते जेंव्हा अश्रुही मदतीला येत नाही तेंव्हा नांगरणी सुरू करतो मी ! उद्यासाठी जमीन तयार करतो. स्वप्न म्हणून नाही तर कर्तव्य म्हणून. 
42-47°
तापमानात जेंव्हा मजूर अंगाला राख फासून जोगडे होतात, तेंव्हा डोक्याला रुमाल बांधून, ग्वागल लाऊन आपण आपली स्टाइल दाखवत ट्रॅक्टरला धक्का मारतो! त्यासाठी बूट पण धंनगरी असावे लागतात. ट्रक्टर डिझेलने फूल केला, पाण्याची बादली नागरला अडकवली, हायड्रोलिक वर केला, ब्रेक काढला की आपण मार्गस्थ. धुळीचा प्रचंड लोट उडवत. धड धड - खड खड. इथे कुठे आलाय आराम इथे तर मागच्या फळीवर लटकुन बसायला पण कसब लागते.




प्रभू - थोडो ऊन उतरब दे न ! काही घाई है ! 
मी - आनो है त चल नाही त म चल्यो ! 
प्रभू - भाऊ बिडी को कट्टल लेनो है , 2-3 विमल की पुड्या लगंगी भला ! पैसा दे 
मी - लिख ले न खाता प !, शेट कु कह्य म्हारो नाव. चहा शक्कर भी लेजो , वापस आबकोच नही पुरो पालटया शिवाय.
लहानपणी बंदुकीच्या लाईव्ह कारतुस शी प्रयोग करतांना प्रभूच्या दोघी हाताची बोटे वाकडी झालीत. त्याला कुठेतरी जीवंत कारतुस मिळाली तिला त्याने बॅटरी च्या सेल आणि बल्ब ला लावली - परिणाम वाघ मारायची कारतुस त्याच्या हातात छरे छरे करून फुटली , डोळे वाचले , सगळ्या चेहर्‍यात छरे घुसले. त्याचे वाचणे पण परमेश्वराची कृपा. किलकिले डोळे करून नेहमी हसत राहणारा प्रभू पाहून सगळा थकवा विसरवा, बिडीचा नाद, बाकी जगाशी मात्र निरासक्त!

प्रभू - हवा कमी वाटत इधका चाक म ! 
मी - नको नाट लगाउ, बठ गुचूप ! प्रभू घोड्या सारखा खिदळणार ....
प्रभू - लव टाप लगानो पडङ्गो ! मायचंद कधी भो 
मी - तू पाणी लेकण आ , आब कल पैठ कूच जांगा घरकू (उद्या सकाळीच जाऊ घरी ) 
प्रभू - मन त कहयेल भी नही घरकांकू ( मी तर घरी सांगून पण नाही आलो ) 
मी - त तू कै पोरी है ? उंकू माहीत है तू म्हारा लार आयेल है जे ( तू काय मुलगी आहे ! त्यांना माहीत असेल की तू माझ्यासोबत आहे ते )
एक आढावा घ्यायचा , सगळे बांध बंधारे फिरून आले की कळते. शेत सांगते काय काम आहेत ते. शेतात पोहोचल्यावर कळते , खूपच घाण झालेय. हरळी, कुंदा, खूट !
रणरणत्या उन्हात सुरवात केली की रात्रीचि थंडी मैत्रीण वाटते, रात्री पाठ टेकावावीशी वाटली तर ढेकळा सारखा बिछाना नाही, मातीची ऊब आणि आईच्या कुशीत साम्य आहे. वरती कोट्यवधी तारकांनी भरलेले आभाळ.
ट्रॅक्टर बंद करणे हा ऑप्शन नाही कारण तो "धक्का आहे" शेतात नांगरतांना जर कुठे झाडाची मुळी अडकली आणि ट्रॅक्टर वर लोड आला तर क्लच दाबायचा पण त्याला बंद पडू द्यायचा नाही. डिझेल संपेल असे वाटले तर गाडी वर मागून घ्यायचे.आणि तरी बंद पडलाच तर रात्री ४ वाजता कोण मदतीला येणार आहे? नांगर खोलायचा ठोका फिटी करून कारण हायड्रोलिक बंद असेल. नांगरलेल्या शेतात पुढच्या टायरला चॅनेल मधून बाहेर काढायचे धक्का मारून फक्त दोघा जणांनी ! मोठ्या टायर वर उभे राहायचे , सरकशीतील जिमनसटीक सारखे हलवून हलवून पुढे मागे करायचे. एकदा तो बाहेर पडीत जमिनीवर आला की २ र्‍या गेरमध्ये उचलायचा.
तुका म्हणे जन्म यावे अनुभव घ्यावा !

Comments

Popular posts from this blog

चिलयपाटी

नदी

मसनखडी आणि चुनीलाल गवळी

देवमाणूस

नाना

एसटी

मराठी मुलांची शाळा, कासमपुरे

मनोगत

ओळख