बशीर ब्रास ब्यांड लोहारा.
बशीर ब्रास ब्यांड लोहारा. लग्न मंडप सजलेला असे , यांचे आगमन व्हायचे तेच मुळात मोठ्या ढोल च्या उगीच वाजवलेल्या बीट्स ने. खुळखुळा , मधूनच पितळी पिपाणी चा आवाज खात्री करून द्यायचा कि आम्ही आलो आहोत. (We arrived) आम्ही हातातील सगळी कामे सोडून तिकडे धाव घ्यायचो. सुरवातीला ते आले म्हणजे घाम पुसायचे त्यांना शेजारच्या गावातून पायी चालत यावे लागायचे, वाद्य साधने डोक्यावरून खाली उतरवायचे, ५-६ जन असायचे बाकीचे २-३ transit मध्ये असत. मुसलमानी हिंदी आम्ही यांच्या कडून शिकलो. (तेरकू मै क्या कह रा, तू पाणी लेके आन भाऊ. मेरकू बडी प्यास लगी है, कित्ता तपरा आजकल.) धावत जावून जग आणायचा भरून पण तेवढे पाणी एकटा मास्टरच पिवून टाकायचा. “ओ बेटा तू वो पानिकी कळशी भरके ला, इत्तेमे हमारा क्या होता !” दोन्ही हातांनी तोल सावरत कळशी भरून दिली कि ते आम्हाला त्यांच्या पिपाण्याना हात लावू देत. मास्टर म्हणजे आम्हांला परब्रम्ह वाटत असे. म्हणजे त्याने आमचे आवडीचे गाणे वाजवले तर, याची देही याची डोळा त्याचा प्रत्यय येई. आर बाजेवले, बजाव. फुकट के पैसे लिये वाटत, कुणीतरी दारुड्या पिंक टाकायचा, मास्टर ...