कवडीचुंबक
आज नाटकआहे (तमाशा हाय किंवा लावणी
हाय च्या उत्साहात), छोटू पम्पुशेठ हाय अशी जाहिरात झाली होती – आमच्या शाळेत 2 छोटे
वळू होते, दुसर्या वर्गात – एकदम गब्बर सिंग - दोघांचे नाव मच्छिंद्र
– (टोपण नाव गफुर). एक मच्छिंद्र उत्पन्न (उत्तम नाही म्हणू शकायचा हा) शिंदे दूसरा
द्वारकाबाईचा नातू. ते माझे कामे ऐकत असत पण अल्लाउद्दीन च्या जिन सारखे होते रिकामे
राहिले तर माझ्या जीवाला घोर आणि गळ्याला फास, वयाने
माझ्यापेक्षा 3 वर्ग खाली होते पण कुणी धोतर ओढ, कुणी
टोपी पाड. त्यांनी सगळीकडे जाहिरात करून ठेवली होती. त्यांच्या सोबत त्यांचे वर्गमित्र
आमचा मेकअप काही जमू देत नव्हते. आता लहान वर्गातील मंडळी आणि माकडा मध्ये फारसा फरक नसतो. त्यांची आमच्या खोलीत यायची धडपड.
आम्हाला सहभागी करून घ्या ही विनवणी वजा दटावणी- नाही म्हटले तर आजून दहा जणांना घेवून
येतील- खिडकीतून डोकावतील – कड्या वाजवतील. मारले तर रडतील शिव्या देतील पण परत येतील.
दोघांच्या नाकातील शेंबडाची लोळी सारखी वर खाली होत असे – त्यांचे नाक सारखे वाहत असायचे
आणि त्याला ते बाहिला पुसत असत.
त्यांना मी विश्वासात घेतले आणि विनंती केली की मोठ्या शहरात पोलिस असतात बंदोबस्ता
साठी तुम्ही तेवढे करा आमच्या साठी. त्यांना वर्गाच्या दारावर उभे केले आणि कुणालाच
आत सोडू नका म्हणून सांगून दिले. लाखन, रवी, राजू, गणेश
ने मला पम्पुशेठ बनविले. रम्या, मवण्या, धुमा ने लत्याला हुबेहूब रामदासी बनविले – ते सगळे तमाशा चा
अनुभव असलेले अनुभवी लोक होते. मोहन उघडे ला पम्पुशेठचा नोकर केशर बनविले. त्याला फारसा मेकअप नव्हता पण
नाटकात त्याला सोटा आणायचे काम होते आणि त्याच्या शरीर प्रकृतीत आणि सोट्याच्या साईज
मध्ये फारसा फरक नव्हता. भीमाने गदा आणावी तसा तो सोटा घेवून आला त्याला बघूनच रामदासी
थरथर करेल असा तो सीन होता. लत्या अप्रतिम होता सर्वच क्षेत्रात, तो मस्तपणे
बापाचा गंध टिळा लावून आणि भारुड वाल्याकडून साहित्य घेवून आलेला होता. त्याच्या खांद्यावर
रामदासीची झोळी, पायात खडावा, मोठे केस – भरघोस दाढी मिशा आणि डोळ्यात आत्मविश्वास. माझी मात्र
भंबेरी उडाली होती.
राष्ट्रगीत झाले – मुलींची स्वागतपर गीते झाली, अध्यक्ष
महोदयांचे, मुख्याध्यापकांचे भाषण
झाले - पण चिल्ली पिल्ली सगळी पम्पुशेठ – पम्पुशेठ करत होती.
तर मित्रांनो – 5 वी चे आपले वर्गमित्र सादर करीत आहेत प्र. के. अत्रे लिखित नाटक
– “कवडी चुंबक”
“तू जाय पहिले – नही तू जाय पहिले” असे करत आम्ही एकत्र आजूबाजूला पाहत आणि सगळे
काय म्हणतील अशी भीतीबाळगत स्टेजकडे निघालो. डायलोग चांगले पाठ होते पण स्टेजवर जाताच
गडबडायची भीती. पण स्वत:ला सावरले आणि झोकात
एंट्री केली. गफुर मंडळी समोरच होती. आमचा मेकअप बघून सगळे हसायला लागले - 10-12 मिनिटे
जमाव सेटल व्हायला लागली. पहिला प्रवेश सुरू झाला. खडया आवाजात मी ओरडलो
पम्पुशेठ - काय रे कुणाला विचारून या घरात
शिरलास? – भिकार्यांना या घरात प्रवेश करायला सक्त मनाई आहे – वाचले
नाही का ?
रामदासी – मी भिकारी नाही – रामदासी आहे – या भुमंडळावर वाटेल तिथे जायची आम्हाला
मोकळीक आहे - जय जय रघुवीर समर्थ ! अशी आरोळी
ठोकली की राजवाड्याचे दरवाजे देखील आम्हाला उघडतात – “समर्थाचीया सेवका वक्र पाहे असा सर्व भुमंडळी कोण आहे ?
पम्पुशेठ – अरे वा SSSS
वा रे वा म्हणे असा सर्व भुमंडळी कोण आहे. तुमच्या मानगुटीला
धरून तुम्हाला गचांडया द्यायला ह्या भुमंडळा वर हा पम्पुशेठ पैठण कर समर्थ आहे. ढेरीवरून
हात फिरवून चष्म्यातून पाहत मी कडाडलो.
नाटक रंगात आले – सगळे पोट धरून हसत होते. संवाद फेकीत मला मोहन मदत करत होताच.
रतीलाल प्रतिभावाण होता, त्याचे न अडखळता चालू होते.
पम्पुशेठ – केशर – केशर अरे मेलास का रे ?
केशर – आतून धावत येतो - काय मालक ?
केशर (मोहन) इतका अगडबंब होता की त्याला पाहून बिना मेकपचे सगळे हसायला लागले
– धावत आल्यामुळे तो धापा टाकत होता. बहुतेक त्याला उघडाच स्टेज वर बोलविले होते. खालून
पुढे बसलेली गफुर मंडळी उपद्व्याप करायला सुरू झाली होती – त्यांना डायलाग मध्ये इंटरेस्ट
नव्हता त्यांना action पाहिजे होती.
केशर – मालक तुम्ही याला ओळखले नाही वाटत ? आपण याला
गेल्या वर्षी एक गुळगुळीत झालेला पैसा दिला होता.
पम्पुशेठ – अरे तू याची झडती घे – याची झोळी तपास
रामदासी – हा निव्वळ जुलूम आहे, मला लुबाडता की काय ?
केशर आणि रामदासीची झोंबाझोंबी सुरू झाली आणि गफुर मंडळी ने कल्ला सुरू केला, स्टेजवर
यायची बाकी राहिली – सुपारीची दोन खांड आणि तीन विडया सापडल्या. त्याचे तांदूळ पण हिसकावून
घेतो.
पम्पुशेठ – “दाणे दाणे पर लिखा हय पम्पुशेठ
का नाम“
नाटक उत्तम जमले – परितोषिक देतांना मला – सरपंच – मोहनसिंग पाहुण्यांनी पम्पुशेठ नावाने हाक मारली आणि घात झाला. त्या वर्षभर गफुर ब्रदर्स ने मला पम्पुशेठ हे नाव पाडले. येता जाता पम्पुशेठ ची डायलाग बाजी त्यांना वर्षभर पुरली.

Comments
Post a Comment