Posts

कवडीचुंबक

Image
5 व्या वर्गात आम्ही एक नाटक बसविले. साहित्याचा आणि नाटकाचा माझा तो पहिला परिचय. आचार्य प्र.  के. अत्रे लिखित “कवडीचुंबक” नाटकातील एक उतारा आम्हाला बालभारती च्या पुस्तकात अभ्यासक्रमात समाविष्ट होता. ठरले की हेच नाटक बसवायचे. खर सांगतो , कुणाचे मार्गदर्शन नाही , कुणी लक्ष्य ठेवणारा नाही. तमाशा आणि टुरिंग टाकीज च्या पिक्चरचा अनुभव गाठीशी आणि तोही प्रेक्षक म्हणून पण आमच्या जवळ होती कल्पकता आणि साकारायचे वेड. तुम्हाला जमणार नाही असे म्हणणारा कोणी नव्हताच आजूबाजूला आणि असता तरी आम्ही एकणार्‍यानपैकी नव्हतो. गुरुजींनी पात्र ठरवून दिले , अनिल तू पम्पुशेठ , रतीलाल तू रामदासी आणि मोहन तू पंपुशेठचा सेवक केशर. आचार्य अत्रेंचे नाटक म्हणजे काही खाऊ नाही. लांबच्या लांब संवाद पण आम्ही एकमेकांचे सुद्धा पाठ करून टाकले. प्रोम्प्टर ची गरजच ठेवली नाही. एक अडकला की दूसरा त्याची गाडी सुरू करून देत असे. शाळेत आम्ही प्रॅक्टीस करत असू पण त्याचे काही फार कौतुक वाटले नाही. पाढे पाठ करायचो , कविता पाठ करायचो माराच्या धाकाने आता धडा पाठ करतो आहोत एव्हढेच. आठ दिवसपण  लागले नसतील. बहुधा 26 जानेवारीचा मुहूर्त होता कारण

देवमाणूस

Image
देवमाणूस खूप दिवसापासून हे मनात होते की ह्या देव मानसाबद्दल चार शब्द लिहावे, मला सांगायचे होते की मा‍झ्या जीवन प्रवासात मला एक देव माणूस भेटला आहे आणि त्यांचे अतोनात उपकार आहे समाज मनावर, नव्या पिढीला त्यांच्या कार्याची तोंड ओळख देण्याचा हा एक छोटासा प्रयत्न! जिथे मस्तक टेकावेसे वाटावे असे पाय भेटण्याचे पण भाग्य लागते, मला ते लाभले आणि त्यांच्या बद्दल मला खूप दिवसापासून लिहायचे होते. आमचे बापु डॉ. करतारसिंग परदेशी, 1984 चे एमएस, मला बापू त्यांचे लग्न झाले ताई सोबत तेंव्हा पासून आठवतात. आम्ही 4-5 वी त होतो तेंव्हा, मोठ्या भावाने लग्नात त्यांची कट्यार मारली, त्याने टोपाझ च्या ब्लेडने कटयारीचा पट्टा कापला, कट्यार वाचवायच्या नादात भाऊचा ब्लेड त्यांच्या बोटाला लागला, रक्ताने हात माखला पण चेहर्‍या वर तेच मिष्कील हसू, वर्‍हाडी मंडळी आरडा ओरडा करत होती, फटके बसले असते पण बापुनी वाचविले ! बापुनी जीवनात खूप ठिकाणी वाचविले तो मात्र लक्षात राहिलेला पहिला प्रसंग. बहीण भाच्या मुळे वेळोवेळी त्यांच्या भेटी होत राहिल्या आणि त्यांचे व्यक्तिमत्व जवळून पाहण्यात आले. एक आदरयुक्त भीती नेहमीच असते त्या

मसनखडी आणि चुनीलाल गवळी

  मसनखडी आणि चुनीलाल गवळी   चुंनीलाल गवळी बद्दल मला प्रचंड आदर आहे , त्याची सेल्फ लेस (निस्वार्थी) सेवा वाखणण्याजोगी आहे. त्याला आमंत्रण लागत नाही , कुठल्याही सामाजिक कामासाठी तो सदैव तयार असतो आणि कुठल्याही वेळेला. तो मुळात सेवा करतोय हे सुद्धा त्याच्या गावी नसेल. बोलायला फटकळ म्हणजे अगदी फाटक्या तोंडाचा पण त्याला भान आहे कुणाला टोमणे द्यायचे आणि कुणाला नाही. मी त्याला नमस्कार करू शकत नाही कारण तो मामा आहे. कुणाच्याही मयतीला हा सर्व प्रथम हजर असतो. सगळे दू:खात असतात तेंव्हा याचे एकच काम "रडणार्‍या जीवांना हलकासा आधार आणि दटावणी देऊन हा प्रेताचे सोपस्कार पूर्ण करणे" मसणात लाकूड आहे किंवा नाही , कुणाकडून ते घेता येईल ते त्याला माहीत असते. लागणार्‍या तुर्खाट्यांचा भारा आणला की नाही , आणला नसेल तर परस्पर तो कुणालातरी सांगून मागवून ठेवतो. किरडी साठी लागणारे बांबू , मयताचे सामान , फेकायला लागणारी चिल्लर , अगरबत्ती , कपूर , हळद कुंकू , तांदूळ , आगीचे मटके , लागणारी दोरी , पायाचे बोट बांधला लागणारी तार , कपाळावर ठेवायला लागणारा रुपया , तोंडात द्यावे लागणारे बिड्याचे पान , प्रेता

पिक्चरची टाकीज

  पिक्चरची टाकीज आमच्या गावात आणि शेतात सगळीकडे काळी माती आहे. तिचा सुवास Eternity / clevin clein पेक्षा १० पट छान आहे फ़क़्त तो बाटलीत भारता येत नाही. त्यासाठी मातीत खेळावे लागते. एकदा आम्ही ब्यांड पार्टी काढायची ठरवली. सगळे खेळ असेच कुणाच्या डोक्यातून निघत आणि त्यांची एकदम अंमल बजावणी होत असे. ब्यांड साठी आम्हाला छोट्या मोठ्या पीठ गाळायच्या तुटलेल्या गाळण्या लागत. तेंव्हा पत्र्याच्या मजबूत आणि मोठ्या गाळण्या येत. तिची जाळी तुटली म्हणजे घरात हट्ट करून किंवा जुन्या अडगळीच्या कपाटातून त्या आम्हाला मिळत. ते अडगळीच भुयारी कपाट इतके मोठे होते कि त्यात घुसतांना राकेलची चिमणी घेवूनच घुसावे लागे. त्यात वेगवेगळ्या टाकावू वस्तू , आया बायांनी आमच्या डोके दुखीला कंटाळून लपविलेल्या वस्तू सापडत. तो आनंद वेगळा असे. गाळण्याची रिम आमच्या ढोलाची रिम बने. सुरवातीला आम्ही नेहमी छोटे मॉडेल बनवत असू. छोट्या गाळणी च्या रिम ला काळ्या चिकन मातीचा गारा लावायचा. त्यावर न्यूज पेपरचा कागद चिटकवायचा. दोन्ही हाताच्या तळव्याने त्या कागदाला ताणून बसविले कि तिला उन्हात वाळवत ठेवत असू. हिला आम्ही डफडी असे नाव दिलेले हो

मराठी मुलांची शाळा, कासमपुरे

Image
  मराठी मुलांची शाळा वडील वारल्यानंतर अर्ध्या दुसरीत माझा दाखला झाला ह्या शाळेत. वाईट दिवसातील शाळा जीने मला शिक्षणासोबत व्यवहार ज्ञान दिले.   शाळा होती १-७  वर्ग – एकूण बांधकाम झालेले वर्ग ५ – अर्ध्या वर्गात मुख्याध्यापकांचे हाफिस. पटावर ३०० , हजर ८० , बाकी गैरहजर.   शाळा भरायची सकाळी ८:३० ते ११:३० मग दुपारी २:३० ते ५:००. एकून शिक्षक , मुखायाध्यापक पकडून ५. दुसरीत आम्हाला ६ वी चा सगळा सिल्याबस पाठ होता. आणि जसे वर्ग वाढले तसे आम्ही एका वर्गात दोन वर्गांचे शिक्षण घेतले. काहीवेळा आम्ही वरच्या वर्गात गेलो आणि अभ्यासक्रम बदलला कि आणखी एक असे तीन तीन सिल्याबस शिकल्यामुळे आम्ही खूप शिल्लक होतो. मुलांना अगदी पदवीत्तर शिक्षण दिले तरी ते दिवे लाऊ शकतात असा माझा ठाम विश्वास आहे.   जाहीर आहे , एका वर्गात २ इयत्ता बसल्यामुळे त्याचे नको ते शिक्षण आम्ही किती लवकर शिकलो ते सांगू शकत नाही. सकाळी शाळेची घंटा वाजायची (एका इलेक्ट्रिक पोलचा १ फुटाचा तुकडा तारेने लटकवलेला होता मुख्याध्यापाकाच्या वर्गाबाहेर , वाजवायचा लोखंड तिथून उचलून त्या पोलवर तालात , लयीत (लटकावलेला असल्यामुळे तो हलायचा) आदळायचा.