एसटी
मला मी कधी एसटीबद्दल सांगेन असे झाले आहे. आम्ही गावात शिकत असतांना आयुष्य हे कसे निवांत होते , प्रत्येकाजवळ वेळच वेळ होता. वाहनांचे प्रकार म्हणजे गाडी बैल , एसटी आणि ट्रॅक्टर. ज्यांनी २५-३० किलोमीटर गाडी बैल ने प्रवास केला आहे त्यांना कुठल्याही वाहन प्रकाराचे महत्व हे वाटणारच. तर जेंव्हा एसटी सुद्धा नव्हती तेंवा तालुक्याच्या गावावरून जाणारी भुसावळ-मुंबई प्यासिंजर जी सकाळी ११ वाजता असायची तिला गाठण्यासाठी आम्ही गाडीबेल ने सकाळी ३ वाजता घरून निघायचो. गाडी बैल वरचे कडब्याचे कुशन , पितळीचा तांब्या , ट्रंक , धान्याचे बाचके , डाळी साळी , केळीचा घोडा , भुईमुगाच्या शेंगा. सगळे पुढे सरकून बसायचे कारण गाडी उरळ यायची ( मागे जर वजन जास्त झाले तर बैलांना फास लागायचा जोत्यांचा (बैलाला दुश्यार ला यानेच जुंपले जायचे). सडक म्हणजे माती आणि जाड्या भरड्या न दबलेल्या खडीचा पसरलेला समुदाय. रस्त्याला भविष्यातील कामासाठी टाकून ठेवलेले खडीचे ढिगारे वर्षानुवर्ष आपली कर्मकथा सांगत राहायचे. रस्ते हि जीवनावश्यक बाब तेंव्हाही नव्हती आणि आजही ती कुणाला वाटत नाही. तर अशा रस्त्यांवरून उद्ळत चालणारे वाहन , खूप लां...