Posts

ओटी आणि बीज

  संध्याकाळी पडून गेलेला तुफान पाऊस , शेतात वाफ असेल कि नाही हि चिंता पण पेरायचा उत्साह अगदी लहान मुलासारखा. चलो - निकलो , व्होयो काई , कर अभी व्होयो नही थामारो ? काई थंडो मान्डो है थामारो. चला निघा , झाले का तुमचे ? अजून झाले नाही ! अरे कसले निवांत राव ? अरे आटोप राजा लवकर जीव जातोय माझा इथे , सगळे पेरणे व्हायला पाहिजे. पेरण्यासाठी आणि प्रोजेक्ट म्यानेजमेंट च्या परीक्षेला सारखाच अलर्ट पण लागतो. दलींदर लोकांचा तो विषय नाही त्यांनी तिकडे फिरकूही नये. बीजाचे रोपण हा पूजेचा विषय असतो , सारख्या लयीत , सारख्या तालासुरात , बैलांचे चालणे , पामरीचा वेग मागच्या पास धरनार्याचा वेग , चाड्ड्यावरची मुठ , माउलीचा वेग , मागे बैल हाणनार्याचा वेग सगळे कसे एक अद्वैत झालेले असते. सगळे बसतील पण त्यांना उसंत नाही , शेतकऱ्याला भरून येणारे आभाळ दिसते , त्याचा जीव कासावीस होतो , सगळे आज एकाच दिवशी पार पडलेत तर माझे पिक समान येयील. मोठ्या शेतकऱ्याला तर दुप्पट टेन्शन , पाऊस आला तर , काम अपूर्ण राहिले तर ? कितीतरी मजूर लावलेले असतात , त्यांची मजुरी वाया नको जायला. बिजवाई , मटेरेल भिजले तर ? पाणी आणून ठ...

बशीर ब्रास ब्यांड लोहारा.

  बशीर ब्रास ब्यांड लोहारा.   लग्न मंडप सजलेला असे , यांचे आगमन व्हायचे तेच मुळात मोठ्या ढोल च्या उगीच वाजवलेल्या बीट्स ने. खुळखुळा , मधूनच पितळी पिपाणी चा आवाज खात्री करून द्यायचा कि आम्ही आलो आहोत. (We arrived) आम्ही हातातील सगळी कामे सोडून तिकडे धाव घ्यायचो. सुरवातीला ते आले म्हणजे घाम पुसायचे त्यांना शेजारच्या गावातून पायी चालत यावे लागायचे, वाद्य साधने डोक्यावरून खाली उतरवायचे, ५-६ जन असायचे बाकीचे २-३ transit मध्ये असत. मुसलमानी हिंदी आम्ही यांच्या कडून शिकलो. (तेरकू मै क्या कह रा, तू पाणी लेके आन भाऊ. मेरकू बडी प्यास लगी है, कित्ता तपरा आजकल.) धावत जावून जग आणायचा भरून पण तेवढे पाणी एकटा मास्टरच पिवून टाकायचा. “ओ बेटा तू वो पानिकी कळशी भरके ला, इत्तेमे हमारा क्या होता !”   दोन्ही हातांनी तोल सावरत कळशी भरून दिली कि ते आम्हाला त्यांच्या पिपाण्याना हात लावू देत. मास्टर म्हणजे आम्हांला परब्रम्ह वाटत असे. म्हणजे त्याने आमचे आवडीचे गाणे वाजवले तर, याची देही याची डोळा त्याचा प्रत्यय येई. आर बाजेवले, बजाव. फुकट के पैसे लिये वाटत, कुणीतरी दारुड्या पिंक टाकायचा, मास्टर ...

पांडवप्रताप

  पांडवप्रताप हटकर गल्लीत मंजुळा मावशीच्या घरी किंवा संपत मामाच्या घरी पांडव प्रताप, हरी विजय, श्री राम विजय, भक्ती विजय, नवनाथ किंवा महाभारत अशा पोथी वाचन असे. रोज रात्री ८:०० ते ९:००/१०:०० असे हे वाचन असे. मंजुळा मावशीच्या दारात उंबराचे झाड होते, तिचा मुलगा राजू माझ्या २ वर्ष पुढे होता. त्याला आम्ही जरदाळू म्हणत. गावात प्रत्येकाचे वेगवेगळे नाव होते. गावातील आया बाया आणि भाविक जण तिथे जमत. पोथी वाचनाराचे एक उच्चासन होते. इलेक्ट्रिक मोटर दुरुस्त करणारा अमरभाऊ मरमट हा एक उत्तम भाष्यकार होता. अमर भाऊ अंगलटने खूप बारीक होता जुन्या मराठीतील त्या ओव्या तो बोली भाषेत सोप्या करून वाचून दाखवायचा. नुकताच पडून गेलेला पाउस, चिखलातून चालत आलेले आम्ही तिथल्या पन्हालीच्या पाण्याने पाय धुवून आत शिरायचो, ओट्यावर किंवा घरात बसण्याची मांडणी असे. पटगर किंवा झोर्या अंथरलेला असे.   वेगवेगळे लोक कुणबी मराठी आणि परदेशी भाषा बोलायचे त्यामुळे शाळेत आम्ही कुणबी मराठी आणि गावातील व्यवहारात परदेशी बोलायचो. माय वो , आह्याSSSSSय भागाबाई काल कुठी गेलत्या ? ह्योनी आला ? कर वा या नामदेव आयोकी ? आज या का...

कवडीचुंबक

Image
5 व्या वर्गात आम्ही एक नाटक बसविले. साहित्याचा आणि नाटकाचा माझा तो पहिला परिचय. आचार्य प्र.  के. अत्रे लिखित “कवडीचुंबक” नाटकातील एक उतारा आम्हाला बालभारती च्या पुस्तकात अभ्यासक्रमात समाविष्ट होता. ठरले की हेच नाटक बसवायचे. खर सांगतो , कुणाचे मार्गदर्शन नाही , कुणी लक्ष्य ठेवणारा नाही. तमाशा आणि टुरिंग टाकीज च्या पिक्चरचा अनुभव गाठीशी आणि तोही प्रेक्षक म्हणून पण आमच्या जवळ होती कल्पकता आणि साकारायचे वेड. तुम्हाला जमणार नाही असे म्हणणारा कोणी नव्हताच आजूबाजूला आणि असता तरी आम्ही एकणार्‍यानपैकी नव्हतो. गुरुजींनी पात्र ठरवून दिले , अनिल तू पम्पुशेठ , रतीलाल तू रामदासी आणि मोहन तू पंपुशेठचा सेवक केशर. आचार्य अत्रेंचे नाटक म्हणजे काही खाऊ नाही. लांबच्या लांब संवाद पण आम्ही एकमेकांचे सुद्धा पाठ करून टाकले. प्रोम्प्टर ची गरजच ठेवली नाही. एक अडकला की दूसरा त्याची गाडी सुरू करून देत असे. शाळेत आम्ही प्रॅक्टीस करत असू पण त्याचे काही फार कौतुक वाटले नाही. पाढे पाठ करायचो , कविता पाठ करायचो माराच्या धाकाने आता धडा पाठ करतो आहोत एव्हढेच. आठ दिवसपण  लागले नसतील. बहुधा 26 जानेवारीचा मुहूर्त ...

देवमाणूस

Image
देवमाणूस खूप दिवसापासून हे मनात होते की ह्या देव मानसाबद्दल चार शब्द लिहावे, मला सांगायचे होते की मा‍झ्या जीवन प्रवासात मला एक देव माणूस भेटला आहे आणि त्यांचे अतोनात उपकार आहे समाज मनावर, नव्या पिढीला त्यांच्या कार्याची तोंड ओळख देण्याचा हा एक छोटासा प्रयत्न! जिथे मस्तक टेकावेसे वाटावे असे पाय भेटण्याचे पण भाग्य लागते, मला ते लाभले आणि त्यांच्या बद्दल मला खूप दिवसापासून लिहायचे होते. आमचे बापु डॉ. करतारसिंग परदेशी, 1984 चे एमएस, मला बापू त्यांचे लग्न झाले ताई सोबत तेंव्हा पासून आठवतात. आम्ही 4-5 वी त होतो तेंव्हा, मोठ्या भावाने लग्नात त्यांची कट्यार मारली, त्याने टोपाझ च्या ब्लेडने कटयारीचा पट्टा कापला, कट्यार वाचवायच्या नादात भाऊचा ब्लेड त्यांच्या बोटाला लागला, रक्ताने हात माखला पण चेहर्‍या वर तेच मिष्कील हसू, वर्‍हाडी मंडळी आरडा ओरडा करत होती, फटके बसले असते पण बापुनी वाचविले ! बापुनी जीवनात खूप ठिकाणी वाचविले तो मात्र लक्षात राहिलेला पहिला प्रसंग. बहीण भाच्या मुळे वेळोवेळी त्यांच्या भेटी होत राहिल्या आणि त्यांचे व्यक्तिमत्व जवळून पाहण्यात आले. एक आदरयुक्त भीती नेहमीच असते त्या...

मसनखडी आणि चुनीलाल गवळी

  मसनखडी आणि चुनीलाल गवळी   चुंनीलाल गवळी बद्दल मला प्रचंड आदर आहे , त्याची सेल्फ लेस (निस्वार्थी) सेवा वाखणण्याजोगी आहे. त्याला आमंत्रण लागत नाही , कुठल्याही सामाजिक कामासाठी तो सदैव तयार असतो आणि कुठल्याही वेळेला. तो मुळात सेवा करतोय हे सुद्धा त्याच्या गावी नसेल. बोलायला फटकळ म्हणजे अगदी फाटक्या तोंडाचा पण त्याला भान आहे कुणाला टोमणे द्यायचे आणि कुणाला नाही. मी त्याला नमस्कार करू शकत नाही कारण तो मामा आहे. कुणाच्याही मयतीला हा सर्व प्रथम हजर असतो. सगळे दू:खात असतात तेंव्हा याचे एकच काम "रडणार्‍या जीवांना हलकासा आधार आणि दटावणी देऊन हा प्रेताचे सोपस्कार पूर्ण करणे" मसणात लाकूड आहे किंवा नाही , कुणाकडून ते घेता येईल ते त्याला माहीत असते. लागणार्‍या तुर्खाट्यांचा भारा आणला की नाही , आणला नसेल तर परस्पर तो कुणालातरी सांगून मागवून ठेवतो. किरडी साठी लागणारे बांबू , मयताचे सामान , फेकायला लागणारी चिल्लर , अगरबत्ती , कपूर , हळद कुंकू , तांदूळ , आगीचे मटके , लागणारी दोरी , पायाचे बोट बांधला लागणारी तार , कपाळावर ठेवायला लागणारा रुपया , तोंडात द्यावे लागणारे बिड्याचे पान , प्रेता...